कॉंग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज (18 एप्रिल) ड्रोनच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवणारा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान टोलेजंग इमारतींना लागलेली आग अवघ्या काही मिनिटांमध्ये विझवण्यासाठी क्षमता हा ड्रोनमध्ये आहे. ट्विटमध्ये मिलिंद देवरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोनमध्ये थर्मल कॅमेरे आहेत. यामुळे आगीच्या धुरामध्येही समोरील गोष्टी स्पष्ट दिसण्यास मदत होते. चीफ फायर ऑफिसर (Chief Fire Officer) प्रभात रहांगदळे यांना ट्वीटमध्ये टॅग करत मिलिंद देवरा यांनी फायरफायटर ड्रोन्सची माहिती दिली आहे.
मिलिंद देवरा यांचं ट्वीट
Requesting Mumbai’s dynamic Chief Fire Officer, @prabhatfire to evaluate firefighting drones for Mumbai’s Fire Brigade.
Drones equipped with thermal cameras enable firefighters to see through smoke & avoid frontline casualties @mybmc pic.twitter.com/HfaEx4cImf
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) April 18, 2020
मिलिंद देवरा यांनी ट्वीट केलेला व्हिडिओ हा दक्षिण पश्चिम चीन मधील Chongqing city परिसरातील आहे. हा फायरफायटिंग ड्रोन 25 किलो वजन उचलू शकतो. तर 10 सेकंदामध्ये 100 मीटर पर्यंत वर जाण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे. 20 जानेवारीच्या फायरड्रीलचं हे दृष्य आहे.
दरम्यान ड्रोनमधील थर्मल इमेजिंग कॅमेरा हा केवळ हॉटस्पॉट्सचा पिनपाईंट करत त्याचा वेध घेत नाही तर सोबतच आगीमध्ये अडकलेल्या लोकांचाही वेध घेतो. दरम्यान फायरफायटिंग ड्रोन्स हे वापरण्यास सोपे असल्याने अनेक चिंचोळ्या भागात येथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचू शकत नाहीत अशा ठिकाणी देखील त्या सहज पोहचू शकतात.