Milind Deora and CM Fadnavis | X @ANI

मुंबई मध्ये वांद्रे परिसरात अभिनेता सैफ अली खान वर त्याच्या राहत्या घरी झालेल्या हल्ल्यातील आरोपी बांग्लादेशी असल्याचं समोर आल्यानंतर भारतात बेकायदेशीरपणे घुसलेल्या बांग्लादेशींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबई शहराला सुरक्षित करण्यासाठी मुंबई आणि एमएमआर भागात राहत असलेल्या बेकायदेशीर बांग्लादेशींना तातडीने पुन्हा त्यांच्या देशात पाठवावे अशी मागणी शिवसेना खासदार मिलिंद देवरा (Shiv Sena MP Milind Deora) यांनी केली आहे.

शिवसेना खासदार देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबतचं पत्र लिहलं आहे. यामध्ये भारताच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आणि सहाजिकच बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्यानंतर अनेकांना मुंबई आणि एमएमआरचा भाग भुरळ घालतो. त्यामुळे हाऊसकिपिंग च्या कामं पाहणार्‍या संस्थांचं नियमित ऑडीट होणं गरजेचे आहे. या कंपन्यांनी लोकांना नोकरीवर ठेवताना त्यांच्या ओळखपत्राची नीट पाहणी करणं आवश्यक आहे. त्यांच्या नागरिकत्त्वाचा पुरावा पाहणं आवश्यक आहे.

दरम्यान सैफ अली खान वर बेतलेला प्रसंग कोणत्याही सेलिब्रीटी प्रमाणे सामान्य नागरिकांवरही येऊ नये अशी प्रतिक्रिया त्यांनी ANI शी बोलताना दिली आहे. Fake Birth Certificates to Illegal Bangladeshi Immigrants in Malegaon: मालेगाव मध्ये जन्म दाखला घोटाळा तपासासाठी CM Devendra Fadanvis यांच्याकडून SIT द्वारा चौकशीचे आदेश .

बेकायदेशीरपणे मुंबईत राहत असलेल्या बांग्लादेशींना डिपोर्ट करा 

सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेला आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर होता. त्याने बिजॉय दास असं नाव सांगून बनावट कागदपत्र बनवली होती. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.