![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/03/Mumbai-Local-Train-2-380x214.jpg)
Mumbai Local Mega Block: मुंबईत उद्या (31 मार्च) लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे उद्या प्रवाशांना लोकल ट्रेन प्रवासासाठी धावपळ करावी लागणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवाशाचे नियोजन करावे. (हेही वाचा- धरभाव ट्रेन पकडताना तरुणाचा तोल गेला; RPF जवानाने वाचवला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माटूंगा- मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक असेल, त्यानंतर ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सीएसएमटी येथून वळवण्यात येतील. तसेच शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर धावतील.
पनवेल - वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट- मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्या मार्गावर चालवतील.