Mega recruitment by Maharashtra state government: प्रदीर्घ पतिक्षेनंतर महाराष्ट्र सरकारने मेगा भरतीस (Mega Recruitment in Maharashtra) सुरुवात केली आहे. मात्र, या भरतीला युवक-युवतींकडून मिळालेला प्रतिसाद आणि पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या पाहता राज्यात बेकारी आणि नोकरीची अवस्था किती भयान आहे याचे वास्तव समोर आले आहे. जागांच्या तुलनेत आलेल्या अर्जांची संख्या पाहिली तर, धक्का बसावा अशी स्थिती आहे. प्राप्त माहितीनुसार सरकारच्या मेगाभरला प्रतिसाद देत 4410 जागांसाठी तब्बल 7.88 लाख अर्ज सरकारकडे आले आहेत.
दरम्यान, प्रशासनात रिक्त असलेल्या एकूण जागांपैकी सुमारे 72 हजार जागांसाठी पदभरती करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने जाहीर केले होते. ही भरती दोन टप्प्यात घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. दरम्यान, पहिल्या टप्पासाठीच इतके अर्ज आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आता किती अर्ज येणार याबाबत आपसूकच उत्सुकता निर्माण झाली आहे. (हेही वाचा, नोकरीला कंटाळलात? मग स्वत:चे सरकारमान्य Post-Office सुरु करा, कमवा बक्कळ पैसा)
कोणत्या विभागासाठी किती अर्ज
प्राप्त माहितीनसुसार, सार्वजनिक बांधकाम, कृषी, वन, वित्त, मत्स आणि जलसंधारण विभागातील आहेत
विभाग |
पदांचे नाव | एकूण जागा | आलेल्या अर्जांची संख्या |
सार्वजनिक बांधकाम विभाग |
कनिष्ठ अभियंता | 405 |
58 हजार |
कृषी विभाग |
कृषी सेवक | 1446 |
82 हजार 307 |
वित्त विभाग |
लेखापाल, क्लर्क, कनिष्ठ लेखापरीक्षक, कनिष्ठ लेखापाल | 959 |
1 लाख 74 हजार |
वन विभाग |
वन रक्षक | 1218 |
4 लाख 3 हजार |
वन विभाग |
वन सर्वेक्षक | 51 |
1233 |
मत्स्य विभाग |
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी | 79 |
591 |
जलसंधारण विभाग | सहाय्यक माती, जल संरक्षण अधिकारी | 282 | 42 हजार78 |
दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केले होते की, राज्य सरकार विविध अस्थापनांमधील 'क' आणि 'ड' श्रेणीतील पदांसाठी नोकरभरती काढेन. त्यानुसार ही पदभरती करण्यासाठी सरकारने गेल्या दोन महिन्यात जाहिराती दिल्या. त्यातून प्रसिद्ध झालेल्या चार हजार पदांसाठी लक्षवधी अर्ज आले आहेत. एकूण जागा आणि आलेले अर्ज यांची तुलना करता एका पदासाठी सरासरी 178 इतके अर्ज आले आहेत. म्हणजेच एका पदासाठी तब्बल 178 उमेदवारांमध्ये स्पर्धा होईल.