खुशखबर! ग्रामविकास विभागात 21 पदांसाठी, 13 हजार 514 जागांची मेगाभरती; पंकजा मुंडे यांची घोषणा
पंकजा मुंडे (Photo Credit : Youtube)

राज्यात नुकतीच शिक्षक भरतीची जाहिरात प्रदर्शित करून, शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकांना दिलासा दिला आहे. आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या 21 पदांसाठी 13 हजार 514 जागांची मेगारती होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त आहेत, त्यामुळे आधी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण कमी व्हावा तसेच राज्यातील सुशिक्षित वेरोजगारांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी म्हणून ही मेगाभाराती होणार आहे.

या पदांसाठी होणार मेगाभरती -

ग्रामविकास विभागाच्या आस्था 8 अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), ग्रामसेवक (कंत्राटी), आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरूष 50 टक्के), आरोग्य सेवक (पुरूष 40 टक्के), आरोग्य सेविका, स्थापत्य अभियंता (सहायक), पशूधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपीक), अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ सहायक (लिपीक), कनिष्ठ लेखा अधिकारी व कनिष्ठ यांत्रिकी आदी पदांसाठी ही भरती होणार आहे. (हेही वाचा: खुशखबर! शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध; पहा कोणत्या वर्गासाठी किती जागा राखीव)

कोणत्या विभागात किती जागा –

ही मेगा भरती राज्यातील सहाही विभागात होणार आहे

पुणे विभाग- 2 हजार 721

औरंगाबाद विभाग- 2 हजार 718

नाशिक विभाग- 2 हजार 574

कोकण विभाग- 2 हजार 51

नागपूर विभाग- 1 हजार 726

अमरावती विभाग- 1 हजार 724

या भरतीसाठी www.mahapariksha.gov.in या संकेतस्थाळावर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असून, पदभरतीबाबतची जाहिरात येत्या 6 मार्चपासून www.mahapariksha.gov.in आणि www.punezp.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानंतर 26 मार्च ते 16 एप्रिल 2019 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.