Accident (PC - File Photo)

Mumbai Nashik Expressway Accident:  मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. जुन्या कसारा घाटात भरधाव टेम्पो ३०० फूट दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारच्या पहाटे ही घटना तीन वाजेच्या सुमारास घडली. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांना घटनास्थळी धाव घेतला. पोलीस घटनास्थळी दाखळ झाले.

मीडिया रिपोर्टनुसार, तीन वाजेच्या सुमारास चालकाच कसारा घाटातून जात होता. अचानक वाहन चालकाचा गाडीवर नियत्रंण सुटल्याने टेम्पो तीनशे फूट खोल कोसळला आहे. कसारा घाटाजवळ हिवाळा ब्रीजजवळ हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखम झाल्याने  दोघांचा मृत्यू झाला. वाहन चालक राहुल जाधव, आणि वाहक गणेश दुसिंग यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी दोघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. टेम्पोचा चालकाला गाडी चालवताना डूलकी लागल्याने हा अपघात झाला असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो मुंबईहून नाशिकला जात होती. दरम्यान ही घटना घडली. अपघातानंतर महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतुक सेवा नियंत्रित केली. दरीतून टेम्पो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे.