जालना येथे मारहाण झालेल्या प्रेमी युगलांनी केले लग्न; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील एक प्रेमी युगल 4 दिवसांपूर्वी जालन्यातील (Jalna) गोंदेगावात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका टोळक्याने प्रेमी युगलाला मारहार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. आता याच प्रेमी युगलाने बुलढाण्याच्या मेंढगावातील मंदिरात त्यांनी लग्न केले असून त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रेमी युगल देऊळगाव राजा तालुक्यातील रहवासी आहेत. मुलगी ही फार्मसी कॉलेजला प्रथम वर्षाला शिकत आहे. तर मुलगा हा अकोला येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील एक प्रेमी युगल काही दिवसांपूर्वी जालन्यातील गोंदेगावात फिरायला गेले होते. यावेळी तळ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोघांना टोळक्याने गाठलं आणि धमकावायला सुरूवात केली.आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. तळ असल्यामुळे आम्ही फिरायला आलो, असे तरूण काकुळतील येऊन चौघांना सांगत होता. अगदी टोळक्याच्या हाता-पाया पडून त्याने माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. मात्र मस्तवाल तरूणांनी तरूणीच्या वडिलांना सांगितले आहे. दरम्यान, प्रेमी युगुलाला मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. याशिवाय राजकीय नेत्यांनी या घटनेवर नाराजी दर्शवत आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवल्या आहेत. हे देखील वाचा- संतापजनक! वर्ध्यानंतर औरंगाबाद येथेही एका नराधमाने महिलेवर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले

जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील प्रेमी युगुलांना मारहाण करुन त्यांच्या व्हिडिओ काढल्याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, तालुका जालना पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींवर IT कायद्याची कलम वाढ करून तपास सहाययक पोलिस निरीक्षक ऐवजी पोलिस निरीक्षक गंदम यांच्याकडे सुपुर्द केला. ज्यामुळे आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले इतर मोबाइल व त्यांच्या हेतूबाबत तपास करण्यासाठी पोलिसांनी 5 दिवसांच्या वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली.