Marathi Bhasha Din Wishes By Political Leaders: महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. 27 फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे महत्व सर्वांना समजावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांनी मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत, चला तर पाहूया
राज्यातील अनेक नेत्यांनी दिल्या मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा, पाहा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ज्येष्ठ साहित्यिक तसेच ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलेले #मराठी भाषेतील अग्रगण्य कवी पद्मभूषण वि.वा.शिरवाडकर उर्फ #कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी शतश: प्रणाम!
मराठी भाषा गौरव दिवसाच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.#मराठी_भाषा_गौरव_दिवस #माय_मराठी pic.twitter.com/iuc6xKhf8H
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 27, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Greetings to all on Marathi Bhasha Gaurav Din!
Honouring a legendary Marathi poet, Kusumagraj on his Birth Anniversary!
|| माझ्या मऱ्हाटी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा ||
मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कविवर्य कुसुमाग्रज यांना… pic.twitter.com/ZkUjhb0lkb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 27, 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार
सर्वांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! यानिमित्तानं आपलं मराठी भाषेवरील असलेलं प्रेम, आदर, आपुलकी, अस्मिता ही आणखीन वृद्धिंगत होवो ही सदिच्छा.
याबरोबरच ज्यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा दिवस साजरा केला जातो ते महान साहित्यिक, 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेते, कविवर्य… pic.twitter.com/ebER3ID3Hh
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 27, 2024
शरद पवार
आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि आपली भाषिक परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहूया. आपल्या काव्यप्रतिभेने अवघ्या मराठी जनांना अभिमान देणारे, मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी झटणारे, साहित्यशिरोमणी कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन आणि सर्वांना… pic.twitter.com/eSQw7VqaYh
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 27, 2024
रोहित पवार
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक मानतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी !
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!
आजचा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात… pic.twitter.com/cpAGPl1QCs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 27, 2024