महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. दरम्यान या आरक्षणासाठी आग्रही असलेल्यांपैकी एक म्हणजे खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje). मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारने दिलेली आश्वासनं पाळली गेली नसल्याने आता चर्चा करणार नाही तर थेट राज्यभर दौरे काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. संभाजीराजे मराठा समाजाच्या समन्वयांसोबत 25 ऑक्टोबर पासून दौर्यावर आहेत . हा दौरा रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर मध्ये आयोजित केला आहे. नक्की वाचा: 127th Constitution Amendment Bill: राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार बहाल, 50% आरक्षण मर्यादेचे त्रांकडे अद्यापही कायम .
दरम्यान संभाजीराजे यांनी मराठा प्रश्नाबाबत मागील काही महिन्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे पण त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्र्यांकडून त्यावर उत्तर मिळालं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केवळ कोविड 19 चं कारण सांगून सारं पुढं ढकलण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मागील महिन्यात संभाजीराजेंनी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. 'अनेक दशकं आर्थिक दारिद्रयात असलेला मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागास आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे आवश्यक आहे' अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.