Manoj-Jarange-Patil | Twitter

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी राज्यभरात पहायला मिळत आहे. एकीकडे राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू असतानाच मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे राज्यभरातील जनतेच लक्ष लागलं आहे. 6 जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिलं नाही तर मराठा समाज विधानसभेची तयारी करेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (हेही वाचा :Case Filed Against Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्याविरूद्ध बीड मध्ये गुन्हा दाखल)

मनोज जरांगे म्हणाले की, "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही यंदा राजकारणात नाही. ना उमेदवार दिलाय, ना कोणाला पाठिंबा दिला. पण, जर 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार. तसेच 5 जूनपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे.

"महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून ७ महिने झाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की त्यांचं काय सांगता येत नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्याचबरोबर "मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे," अशी टीकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.