Mamata Banerjee Raksha bandhan with Uddhav thackeray: ममता बॅनर्जी यांनी मुंबईत उध्दवठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बांधली राखी (पाहा फोटो)
Mamata Banerjee tied rakhi

Mamata Banerjee Raksha bandhan with Uddhav thackeray: रक्षाबंधनानिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी त्यांना राखी बांधली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. राजकिय नेत्यांकडून देखील रक्षाबंधनचा सण साजर करण्यात आला आहे. इंडिया आघाडीची बैठकीसाठी ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्या. उद्धव ठाकरें सोबत त्यांनी आदित्य ठाकरे यांनाही राखी बांधली. ममता बॅनर्जी मुंबईत दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देवून ममातीजींच स्वागत केल.