मलाड (Malad) येथे एका 65 वर्षीय वृद्धाला तरुणीला डेट करावे असे वाटत होते. त्यामुळे त्याने एका वेबसाईटच्या माध्यमातून तरुणीला डेट करण्याचा वेडेपणामुळे त्याला चक्क 46 लाख रुपयांचा गंडा घातला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या वृद्धाने मालाड पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
इंटरनेटवर काही गोष्टी सर्च करत असताना वृद्धाला एका डेटिंग साईटवरुन Looking For नावाने लिंक मोबाईलवर आली. त्यानंतर वृद्धाने लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी विचारले. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर मीरा नावाच्या तरुणीच्या नावाने फोन आला. त्यामध्ये तीन तरुणींचे फोटो पाठवून त्यामधून एका तरुणीला निवडण्यासाठी ऑप्शन देण्यात आले. तरुणीला निवड केल्यानंतर त्याला 25 हजार रुपये भरण्यास सांगितले. तेसुद्धा वृद्धाने भरले आणि रोझी नावाच्या तरुणीसोबत त्याचे संवाद सुरु झाला होता.
परंतु काही दिवसानंतर त्या तरुणीचा फोन येणे बंद झाले. त्यानंतर डेटिंग साईडवरुन फोना आला की, रोझी हिला डेट करायचे असल्यास 7 लाख रुपये आणखी भरावे लागणार आहेत. यावेळी सुद्धा वृद्धाने ते सर्व पैसे भरले. अशा पद्धतीने वृद्धाकडून जवळजवळ 46 लाख रुपये उकळले गेले. मात्र जेव्हा वृद्धाने वेबसाईटवर जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपल्याला फसवले गेल्यामुळे त्याला धक्का बसला. त्यामुळे वृद्धाला डेटिंग साईटवरुन तरुणीला डेट करणे चांगलेच महागात पडले आहे.