धक्कादायक! दक्षिण मुंबईतील कोविड सेंटर मधील रुग्णाने चाकूने केला परिचारिकेवर हल्ला, IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

कोरोना काळात रुग्णांसाठी अहोरात्र झटणा-या डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य वैद्यकिय कर्मचा-यांना कोविड योद्धा म्हणून संबोधले जात असताना दक्षिण मुंबईत (South Mumbai) मात्र धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दक्षिण मुंबईतील एका कोविड सेंटरमध्ये (COVID Centre) एका कोविड रुग्णाने परिचारिकेवर चाकूने हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. या हल्ल्यात परिचारिकेला जखमा झाल्या आहेत. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोविड सेंटरमध्ये नीट उपचार होत नसल्या कारणाने रुग्णाने रागाच्या भरात चाकूने नर्सवर हल्ला केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 324, 504, 188 आणि 270 IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मेस्मा अॅक्टनुसार सेक्शन 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Maharashtra COVID-19 Restrictions: महाराष्ट्रामध्ये अजून कडक झाले निर्बंध; विवाहसोहळ्यासाठी 25 लोकांनाच परवानगी, सामान्य नागरिकांना लोकलमध्ये बंदी

ही घटना 16 एप्रिल रोजी मलबार हिल भागातील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान महाराष्ट्रात मागील 24 तासांत 67,468 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 40,27,827 वर पोहोचली आहे. तर मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 7684 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 6,01,590 वर गेली आहे. आज शहरात 6790 रुग्ण बरे झाले असून, 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईमध्ये 84,743 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.