BSE Mahurat Trading 2019 Date and Time: दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुंबईत बीएसइ आणि नेशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. यंदा ही ट्रेडिंग पूजा आज (27 ऑक्टोबर) दिवशी आयोजित करण्यात आली आहे. अभिनेत्री मौनी रॉयच्या उपस्थितीमध्ये या पूजेला सुरूवात झाली आहे. आह संध्याकाळी लक्ष्मी पूजनचा मुहूर्त साधत देशातील शेअर्स आणि कमोडिटी बाजार खुले राहणार आहेत. मुहूर्त ट्रेडिंग (Live Trading Session Time) आज संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांपासून ते 7 वाजपासून 15 मिनिटांपर्यंत तासभरासाठी खुले राहिल. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर ट्रेडिंगसाठी विशेष सत्र आयोजित केले जाते. लक्ष्मी पूजानादिवशी आर्थिक भरभराटीसाठी ही पूजा आणि शेअर बाजारातील व्यवहार सुरू ठेवले जातात. Lakshmi Pujan 2019 Date & Shubh Muhurat: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 37 वर्षांनी जुळून आलाय 'हा' योग; जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त.
यंदा दिवाळीमध्ये उदयाचा दिवस हा बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्याचा आहे. उद्या सोमवार असल्याने कमोडीटी बाजार सकाळच्या सत्रामध्ये बंद राहतील मात्र संध्याकाळी बाजार पुन्हा खुले जाणार आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गुजराती समाजाचं नवं वर्ष सुरू होते. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवसाचं विशेष महत्त्व असतं.
ANI Tweet
Mumbai: #Mahurattrading begins at Bombay Stock Exchange (BSE), actor Mouni Roy present. #Diwali pic.twitter.com/xiK6IbELlO
— ANI (@ANI) October 27, 2019
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1957 पासून मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करत आहे. तर एनएसई मध्ये 1992 पासून ही परंपरा आहे. थोड्या प्रमाणात का होईना पण लक्ष्मी पूजनादिवशी शेअर खरेदी करणं शुभ मानलं जातं. मागील 13 वर्षांमध्ये करण्यात आलेल्या पूजेनंतर 11 वेळेस मार्केट सकारत्मक उघडले होते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी व्यवहारांची वही, तिजोरी यांच्यासोबतच सोन्या-चांदीची पूजा केली जाते.