Maharashtra Govt Trust Vote: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने (Mahayuti Government) 237 आमदारांच्या पाठिंब्याने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. तीन दिवसीय विशेष महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीने बहुमताने आवाजी मतदानाने आपले बहुमत सिद्ध केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार उदय सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, भाजपचे संजय कुटे आदींनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता. आज विधानसभेत आवाजी मतदानाने हा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्याची घोषणा केली.
विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड -
सोमवारी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. सभापती म्हणून नार्वेकर यांची ही दुसरी टर्म सुरू झाली आहे. विरोधी महाविकास आघाडीने उमेदवार न दिल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, महायुती युतीने (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) 288 पैकी 230 पेक्षा जास्त जागा बहुमत सिद्ध केलं. तसेच महाविकास आघाडीला केवळ 46 जागा जिंकता आल्या. (हेही वाचा - Maharashtra Politics: फडणवीस सरकार उद्या बहुमत सिद्ध करणार, राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड निश्चित)
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेलसा 41 जागा मिळाल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीतील शिवसेनेला (UBT) 20 तर काँग्रेस आणि NCP (SP) यांना अनुक्रमे 16 आणि 10 जागा मिळाल्या. (हेही वाचा - Maharashtra CM swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video))
तथापी, 5 डिसेंबर रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. या सोहळ्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.