Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

MVA Seat Sharing Formula: महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चा लोकसभेचा (Lok Sabha Election 2024) जागा वाटपाचा फॉर्म्युला (MVA Seat Sharing Formula) ठरला आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केलं आहे. शिवसेना (यूबीटी) 21 जागा लढवण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस 15 जागांवर लढू शकते. तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 9 जागा मिळू शकतात. नुकतेच महाविकास आघाडीमध्ये सामील झालेला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्ष वंचित बहुजन आघाडी (VBA) दोन जागा लढवण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला एक जागा मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार यांच्या निवासस्थानी जागावाटपासंदर्भाती बैठक पार पडली.

काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख आणि शिवसेनेचे (यूबीटी) संजय राऊत आणि विनायक राऊत या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते. (हेही वाचा -Sharad Pawar Invited CM Eknath Shinde for Lunch: शरद पवार यांचे सीएम एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामती येथे जेवणाचे निमंत्रण)

तथापी, महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अधिकृत घोषणा युतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून केली जाईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. दरम्यान, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत म्हणाले की, MVA चे नेते भेटून चर्चा करतील आणि जागा वाटप कराराला अंतिम मंजुरी देतील. त्यानंतर पत्रकार परिषदेत जागा वाटपासंदर्भात घोषणा केली जाईल. लोकसभेच्या 48 जागांवर सर्वसमावेशक चर्चा झाली. कोण किती जागा लढवणार हे नव्हे, तर जिंकणे महत्त्वाचे आहे, असं राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले. (Devendra Fadnavis Death Threat Case: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी शरद पवार यांचा कार्यकर्ता योगेश सावंत अटकेत)

लोकशाही आणि संविधानाचे रक्षण हाच आमचा अजेंडा आहे आणि प्रकाश आंबेडकरांचाही तोच विचार आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केलं. दरम्यान, काँग्रेस नेते 4 मार्च रोजी उमेदवारीबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक घेणार असून, त्यानंतर नावे निश्चित केली जाणार आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.