राज्य विधिमंडळ अधिवेशनात (Maharashtra Winter Session 2021) आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि स्वयंघोषीत बाबा कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. नितेश राणे यांनी केलेले वक्तव्य कोणत्याही प्रकारे समर्थनिय नाही. त्यामुळे त्यांना निलंबीत करण्या यावे, अशी जोरदार मागणी सत्ताधारी आमदारांनी केली. यावर नितेश राणे यांना कडक शब्दांमध्ये समज देण्यात आली आहे. त्यामुळे अशा कारवाईची आवश्यकता नाही, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि भाजपच्या इतर आमदारांनी घेतली.
विधिंडळ आवारात भाजपचे आमदार आंदोलन करत होते. दरम्यान, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे राज्यमंत्री सुनिल केदार यांच्यासोबत सभागृहात प्रवेश करत होते. या वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना पाहून 'मॅव मॅव' असा आवाज काढला. यावरुन महाविकासआघडी सरकारमधील आमदार आणि मंत्रिही आक्रमक झाले आहेत. अनेक आमदारांनी नितेशराणे यांच्या निलंबनाची मागणी केली. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नितेश राणे यांनी दिलगीरी व्यक्त करावी. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तर प्रश्न निकाली निघेल. अन्यथा सभागृह पुढील कारवाई करेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले. (हेही वाचा, Maharashtra Winter Session 2021: विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक आज किंवा उद्या पार पडण्याची शक्यता, भाजपकडून आमदारांना व्हीप जारी)
दरम्यान, नवाब मलिक यांनी कालिचरण महाराज या स्वयंघोषीत बाबाने महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी केली. कालिचरण महाराज यांनी एका धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्याबद्दल अनुचित उद्गार काढले. हे उद्गार इथके अनुचीत आहेत की, जे आम्ही इथे देऊ शकत नाही. जिज्ञासू हे उद्गार पाहण्यासाठी इथे दिलेला व्हिडिओ पाहू शकतात.
ट्विट
सतय , अहिंसा को झूठे और हिंसक कभी हरा नही सकते, बापू हम शरमिंदा हैं तेरे कातिल जिंदा हैं । https://t.co/D5TPlAGKnq
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 26, 2021
दरम्यान, कालिचरण महाराज याला आतापर्यंत अटक का झाली नाही? असा सवाल भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनीदेखील कालिचरण महाराजास अटक व्हावी ही मागणी केली.