महाराष्ट्रात दोन वर्षानंतर गणपती उत्सव (Ganeshotsav 2022) होणार आहे. वास्तविक, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे गणपती उत्सव अजिबातच साजरा झाला नाही, असे म्हणता येईल. महाराष्ट्रातील नवीन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारने सर्व निर्बंध हटवल्यामुळे यंदा गणेश चतुर्थी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा (Lalbagh Cha Raja) सजला आहे. यासोबतच गणेश गल्लीतील गणपतीची पहिली झलकही दाखवण्यात आली आहे. मुंबईतील हजारो गणपती पंडालमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, सोबत गणेशमूर्ती आणणारेही जोरदार तयारीत व्यस्त आहेत. हेही वाचा Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात करण्यात आली गणरायाची आरती
आजपासून मुंबईत गणपती उत्सवाची सुरुवात धूमधडाक्यात होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने गणपती भक्तांसाठी विशेष गाड्या आणि टोलनाक्यांवर वाहने मोफत नेण्याची व्यवस्था केली आहे. मुंबई पोलिसांनीही तयारी केली असून संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजकीय रंग यंदाही मुंबईत गणपती उत्सवात पाहायला मिळत आहे.
भाजपने शहरात ठिकठिकाणी गणपती उत्सवाचे पोस्टर बॅनर लावले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाने गणपती उत्सवाच्या दृष्टीने जोरदार प्रचार केला आहे. यासोबतच गणपतीच्या मंडपात राजकीय पोस्टर्सही दिसत आहेत कारण काही महिन्यांनी मुंबईसह जवळपासच्या अनेक महानगर पालिकांच्या निवडणुका आहेत. दोन वर्षांनंतर होणाऱ्या गणपती उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पक्ष करत आहेत.
गेल्यावर्षी गणेश उत्सवावर अनेक निर्बंध होते. मागील वर्षी सार्वजनिक पंडालमध्ये मूर्ती आणताना आणि विसर्जनासाठी 10 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकत नव्हते. मूर्ती घरात आणताना आणि विसर्जनासाठी नेत असताना जास्तीत जास्त पाच जणच राहू शकत होते. सर्व भाविकांना मास्क घालणे आणि सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक होते.
गणेशोत्सवादरम्यान मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस अनिवार्यपणे घ्यावे लागले. गणपतीला ऑनलाइन भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सार्वजनिक गणपती पंडालमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पालिकेने बंदी घातली होती. तसेच उत्सवादरम्यान शहरात कलम 144 लागू करण्यात आले होते.