Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी उन्हाळा कडक होत असल्याचं चित्र असताना आज काही भागांमध्ये पावसाच्या धारा बरसल्याचं चित्रं पाहायला मिळायलं आहे. आयएमडीकडून तळ कोकणासह सांगली, कोल्हापूर भागामध्ये पाऊस बरसणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, बांदा, आणि दोडामार्ग तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं देखील कोसळून पडल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही पाऊस झाला आहे. पावसामुळे कोकणात आंबा, काजू, कोकम या झाडांचं नुकसान होणार आहे.

मिरज मध्येही पावसासोबत जोरदार वारे वाहत असल्याने घरांची छप्परं उडून गेल्याचं पहायला मिळालं आहे. तर काही ठिकाणी झाडं मुख्य रस्तावर पडल्याने वाहतूक रखडली होती. Mumbai Weather: मार्च-अखेरपर्यंत मुंबई, ठाण्याचे तापमान घसरण्याची शक्यता .

हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आता 27-30 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेमध्ये वाढ होणार आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत कमाल 34 आणि किमान तापमान 23 अंशाच्याच्या आसपास असेल.त्यामुळे सध्या उन्हाच्या प्रखरेपासून तात्पुरता सुटकारा मिळणार आहे.