Maharashtra Weather : आठवड्या्च्या पहिल्या दिवशी हवामान विभाग(Weather Department)ने पुढच्या ४ दिवसांत राज्यात उष्णतेची लाट (Heat Wave) येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोकण, गोव्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये, कारण असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. (हेही वाचा :Weather Update: उष्णतेच्या लाटेबाबत अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता)
दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मुंबई ठाण्यामध्ये उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. हवामान विभागाने मुंबई आणि ठाणेकरांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात गारपीटसह पावसाची हजेरी असणार आहे.
सध्या हवामानात मोठे बदल होत असून गुजरातमधून येणारी उष्ण हवा कोकण, उत्तर- मध्य महाराष्ट्रात येत आहे, तसेच कमी पाऊस, कोरडी माती, एल निनोचा प्रभाव, वाऱ्याच्या खंडिततेचा परिणाम यामुळे कमाल तापमान वाढत आहे.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा 30 -40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे I
कोकणातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे I
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया pic.twitter.com/k45ImuGMU0
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 28, 2024