आज राज्यातील काही जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट (Rain Alart) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यासह कोकणात आज जोरदार पावसाचा अंदाज (Maharashtra Weather Update) हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशीम, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हा हवामान विभागाच्या वतीन वर्तवण्यात आला आहे. (हेही वाचा - Mumbai Rain Update: मुंबईकरांनो काळजी घ्या! 24-25 ऑगस्ट रोजी शहरात मुसळधार पावसाचा इशारा)
राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमान 32 अंश सेल्सिअसच्या वर आहे. ढगाळ हवामानामुळे उकाड्यामध्ये देखील वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळताना दिसतेय. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस थोडा थंडावला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसत आहे. कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. आता संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 24-25 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची देखील शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 31 तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस आहे. आज जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. कोकण पुढील सात दिवस पावसाचा अंदाज आहे.