Maharashtra Weather Prediction,23June: भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसांत केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण आतील कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येणाऱ्या आवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पश्चिमेकडील वाऱ्यांच्या बळकटीकरणामुळे, पुढील पाच दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाच्या हालचालींमध्ये वाढ अपेक्षित आहे.
हवामान विभागाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी मंगळवार आणि बुधवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस पाडला आहे. सध्या मॉन्सून राज्यात प्रगती करेल असे वातावरण आहे. आजपासून पुढील काही दिवस कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच ते सात दिवस कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या पावसाचा अंदाज)
भारतीय हवामान खात्याने (IMD) इशारा दिल्या प्रमाणे तुम्ही जर केरळ, किनारपट्टी आणि दक्षिण आतील कर्नाटक आणि महाराष्ट्रासह भारताच्या दक्षिण भागात राहत असाल तर आतापासून सतर्क व्हा. कारण येत्या तीन दिवसांत नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे सरकेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर मुंबईत पुढील तीन ते चार तासात जोरदार पाऊस होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.