राज्यात साल 2023 मध्ये अनेक ठिकाणी पाऊस हवा तेवढ्या प्रमाणात पडला नाही. परिणामी अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सध्या राज्यातील तीन हजार धरणांतील पाणीसाठा 76.20 टक्के इतकाच आहे. यामुळे उन्हाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता जलसंपदा विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20.25 टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झालीये. मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच जाणवू लगल्यात. राज्यात 2 हजार 994 लहान-मोठी धरणे असून त्यातील पाणीसाठा कमी होत आहे. (हेही वाचा -Pune Water Storage News: पुण्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट, लवकरत घेण्यात येणार पाणीकपातीबाबतचा निर्णय)
मुंबईतील धरणांचा पाणीसाठा -
भातसा:
गेल्या वर्षी - 82.81
या वर्षी - 77.80
मोडक सागर
गेल्या वर्षी 76.23
या वर्षी 68.05
तानसा
गेल्या वर्षी 84.99
या वर्षी 79.79
मध्य वैतरणा
गेल्या वर्षी 49.57
या वर्षी 47.37
राज्यातील धरणांमधील पाणीसाठा
नागपूर
गेल्या वर्षी 81.01
या वर्षी 70.17
अमरावती
गेल्या वर्षी 86.65
या वर्षी 72.36
संभाजीनगर
गेल्या वर्षी 90.73
या वर्षी 43.42
नाशिक
गेल्या वर्षी 97.21
या वर्षी 73.79
पुणे
गेल्या वर्षी 87.11
या वर्षी 81.17
पुणे शहरात पाण्याची परिस्थिती भविष्यात गंभीर होणार असून मोठा प्रश्न उद्भवणार आहे. आयुक्त, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना एक महिन्यापूर्वी या संदर्भात पत्र लिहून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती, खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पाण्याचे साठे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. राज्यात सगळीकडे अशी परिस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये पाण्याची परिस्थिती सांगितली जाते.