महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीच्या महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. भाजपा, शिवसेना आणि एनसीपी यांनी एकत्रपणे ही निवडणूक लढली आहे. आता त्यांचे निकाल महायुतीला बळकटी देणारे आहेत. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आणि आम्ही चक्रव्युह भेदण्यात यशस्वी झाल्याच' ते म्हणाले आहेत. आजच्या निकालानंतर महाराष्ट्राने आपण पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचं दाखवून दिल्याचं म्हटलं आहे. तर खरी शिवसेना आणि खरी एनसीपी कोणाची यावर या मतदानातून जनतेने शिक्कामोर्तब केल्याचंही म्हटलं आहे.
मुख्यमंत्री कोण होणार?
आज विधानसभा निकालानंतर दोन दिवसांतच राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी पत्र देणं गरजेचे आहे अन्यथा विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने राष्ट्रपती लागवट लागू होण्याचा अंदाज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र मिळून घेणार असल्याचं म्हटलं आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री हा कोणत्याही निकषावर नाही तर एकत्र बसून पक्षाकडून ठरवला जाईल असं म्हटलं आहे.
सध्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल हे एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत.
आधुनिक अभिमन्यूने चक्रव्यूह तोंडून दाखवला आहे ! - देवेंद्र फडणवीस ! 🤩🔥🔥
हा असतो खरा विनम्र नेता जो एवढ्या प्रचंड विजयाने देखील माजत नाही ! 💕🚩 pic.twitter.com/2wmMZBllxa
— KhadakSingh🚩 (@khadaksingh_) November 23, 2024
देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचं महाराष्ट्राचं यश हे तिन्ही पक्षांच्या एकजुटीचं असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण चाणाक्य नाही. देवेंद्र फडणवीस म्हणून आपलं योगदान अगदी सामान्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
विरोधकांना सुनावलं
विरोधकांकडून संजय राऊत यांनी महायुतीचं यश हे 'काहीतरी गडबड' असल्याचं म्हटलं आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सुनवले आहे. झारखंड मध्ये झालेलं मतदान म्हणजे पारदर्शक आणि लोकाशाहीला बळकटी देणारं आणि महाराष्ट्रात महायुतीचा विजय होत असताना इथे निवडणूक आयोगाने गडबड केल्याचं सांगणं चूकीचं आहे.