Maharashtra Unlock 3: महाराष्ट्रात 5 ऑगस्ट पासून 'मिशन बिगीन अगेन' अंंतर्गत केवळ आऊट डोअर व्यायामप्रकार, खेळांना परवानगी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असताना आता लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. काल जाहीर करण्यात आलेल्या अनलॉक 3 च्या नियमावलीमध्ये जीम, योगा सारख्या फीटनेस सेंटर्सला देखील लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे असे सांगण्यात येत असले तरीही आज महाराष्ट्र सरकरने त्याबद्दल स्पष्टता दिली आहे. दरम्यान मिशन बिगीन अगेन अंतर्गत 5 ऑगस्टपासून केवळ आऊट डोअर व्यायामशाळा, जीमनॅस्टिक यांना मुभा असेल अशी माहिती देण्यात आली आहे.

भारतासह महराष्ट्रातदेखील 31 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन असेल पण यामध्ये मॉल, शॉपिंग सेंटर सोबत जीम आणि फीटनेस सेंटर खुली होणार आहेत. मात्र ही आऊट डोअर व्यायामाच्या प्रकाराची सेंटर असतील. त्यामध्येही सोशल डिस्टंसिंग आणि हायजिनची काळजी घेत या अ‍ॅक्टिव्हिटी सुरू होतील. प्रामुख्याने मोकळ्या जागी खेळले जाणारे खेळ आता हळूहळू सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आहे. गोल्फ़, बॅटमिंटन, टेनिस,आऊट डोअर नेमबाजी सेंटर अशांचा समावेश असेल.  Maharashtra 'Mission Begin Again': महाराष्ट्रामधील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवला; मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी, जाणून घ्या काय असेल सुरु.

ANI Tweet

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 4,00,651च्या पार गेला आहे. आजवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 14,463 आहे. सध्या हळूहळू राज्यात रिकव्हरी रेट देखील सुधारत आहे. सध्या तो 59.84% आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, पुणे अशा गजबजीच्या ठिकाणी कोरोना बाधितांच्या अ‍ॅक्टीव्ह रूग्णांचा आकडा अधिक आहे.