Governor BS Koshyari I Photo Credits: Twitter

सर्वोच्च न्यायालयाने यंदा पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं बंधनकारक केल्यानंतर आज (2 सप्टेंबर) महाराष्ट्राचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा हे देखील उपस्थित होते मुंबईमध्ये राजभवनावर ही भेट झाली असून त्यांना कुलगुरूंच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचा अहवाल सांगण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कुलगुरूंसोबत बोलून युजीसीकडे कधी पर्यंत वेळ मागितला जावा, परीक्षा कशा घेतल्या जातील? याची चर्चा झाली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठांनी यंदा सप्टेंबर महिना अभ्यासासाठी दिला आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच सुरक्षित परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कशी परीक्षा घेतली जाणार याची चर्चा कुलगुरूंसोबत झाली आहे. विद्यार्थ्यांना घरातच सुरक्षित राहून परीक्षा द्यायची आहे. तसेच ही परीक्षा कमीत कमी मार्कांची असेल असे देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

ट्वीट

युजीसीने 30 सप्टेंबर पर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्यानुसार परिस्थिती पाहून राज्य सरकारला युजीसीकडे तारखा ठरवण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असा आदेश दिला आहे. आता या आदेशानुसार परीक्षा होणार आहेत.