Rains (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार झाला होता. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात पूरपरिस्थिती उद्भवली. परिणामी, राज्यातील विविध जिल्ह्यात मोठी जीवितहानी झाली असून नागरिकांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावा लागले आहे. राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात येत्या 31 जुलैपर्यंत पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच कोकणसह, मुंबई, ठाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाची जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात येत्या 31 जुलैपर्यंत पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या 30 आणि 31 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे तर, पालघर, मुंबई, ठाणे आणि सिधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Floods: पूरग्रस्त भागातील दौऱ्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

ट्वीट-

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या तसेच पूरपरिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. पुराचे पाणी शहर, गावांमध्ये शिरल्याने तालुक्याच्या अनेक ठिकाणी सातत्याने वाहतुकीची वर्दळ असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यालगतची माती अनेक ठिकाणी वाहून गेली. काही ठिकाणी रस्त्यामध्ये खोल खड्डे पडले आहेत. तर, काही ठिकाणी रस्तेही खचले आहेत. वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी तसेच अपघाताला वाहनचालक तसेच प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.