Maharashtra TET 2024 Registration: (Maharashtra State Council of Examination) कडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra Teacher Eligibility Test 2024) साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज दाखल करू शकतात. MAHATET 2024 साठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. दरम्यान नेमकी ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे? हे देखील नक्की जाणून घ्या.
MAHATET 2024 साठी अर्ज ऑनलाईन कसा कराल?
- www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- होम पेज वर तुम्हांला Maharashtra TET 2024 link दिसेल.
- आधी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
- अर्जासोबत फी भरून, आवश्यक कागदपत्रं अपलोड करून फॉर्म सादर करा.
- तुमच्या अर्जाची तुम्ही प्रिंट देखील काढून ठेवू शकता.
Maharashtra TET 2024 रजिस्ट्रेशन साठी या थेट लिंक वरही क्लिक करू शकाल.
MAHATET 2024 परीक्षा कधी?
TET Paper I आणि Paper II हे 10 नोव्हेंबर 2024 दिवशी आयोजित केले आहेत. सकाळी 10.30 ते 1 आणि दुपारी 2 ते 4.30 या वेळेमध्ये ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून पात्र होण्याकरिता ही परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पेपर I हा इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना शिकवणार्या शिक्षकांसाठी असतो तर पेपर IIहा सहावी ते आठवी च्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असतो.
MAHATET 2024 ची इथे पहा जाहिरात सविस्तर
महाराष्ट्र टीईटी परीक्षेचे प्रवेश पत्र 28 ऑक्टोबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2024 दरम्यान ऑनलाइन च्या माध्यमातून उमेदवार प्रिंट करू शकतात. दरम्यान या परीक्षेचे अर्ज उमेदवारांना केवळ Online माध्यमातून करता येणार आहेत. ऑफलाईन आलेले अर्ज स्विकारले जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.