Representational Image (File Photo)

Farmer Suicide in Maharashtra: महाराष्ट्रात या वर्षी अवघ्या सहा महिन्यांत एकूण 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide in Maharashtra)केल्याची धक्कादायर आकडेवारी समोर आली आहे. ज्याच सर्वाधिक मृत्यू विदर्भात झाले आहेत. अमरावती (Farmer Suicide in Amravati)विभागात 557 मृत्यू झाले आहेत. राज्य सरकारच्या अहवालात मनूद केलेल्या जानेवारी ते जूनच्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभाग 430 मृत्यूंसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर नाशिक विभागात 137, नागपूर विभागात 130 आणि पुणे विभागात 13 मृत्यू आहेत. समुद्र किनारी कोकण विभागात एकही शेतकऱ्याच्या मृत्यूची झालेली नाही. (हेही वाचा:Amravati Farmer Suicide: मार्च-एप्रिल महिन्यात अमरावतीत 66 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 2001 पासूनची आकडेवारी पाहून व्हाल थक्क )

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार, 2022 मध्ये, देशातील सर्व शेतकरी आत्महत्यांपैकी 37.6 टक्के महाराष्ट्रात झाल्याचे म्हटले आहे. एनसीआरबीने म्हणण्यानुसार 5,207 शेतकरी आणि 6,083 शेतमजूर असलेल्या 11,290 व्यक्तींनी 2022 मध्ये आपले जीवन संपवले. देशातील सर्व आत्महत्यांपैकी 6.6 टक्के प्रमाण म्हणजे 1,70,924 इतके शेतकरी महाराष्ट्रातील होते.

2021 मध्ये देशात 5,318 शेतकरी आणि 5,563 शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. यापैकी 37.3 टक्के मृत्यू महाराष्ट्रात होते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये एकूण 1,64,033 व्यक्तींनी आत्महत्या केल्या. ज्यात 6.6 टक्के शेतीशी संबंधित आहेत. 2020 मध्ये, शेती क्षेत्रातील एकूण 10,677 व्यक्ती आत्महत्या केल्या, जे देशभरात अशा 1,53,052 मृत्यूंपैकी 7 टक्के होते. 2020 मध्ये महाराष्ट्रात 37.5 टक्के मृत्यू झाले. तरीही योगायोगाने, देशाच्या जीडीपीमध्येही महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे