सरकारी कर्मचा-यांसाठी खुशखबर! राज्य सरकारने केली महागाई भत्त्यात 3% वाढ
Indian Currency | (Photo Credits: PTI)

नववर्षाच्या सुरुवातीला राज्य सरकारने सरकारी कर्मचा-यांसाठी (Government Employees) एक मोठे गिफ्ट आणले आहे. ते गिफ्ट म्हणजे राज्य सरकारने (State Government) सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 3% वाढ झाली आहे. नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्य सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. वर्षाची सुरुवात या गोड बातमीने झाल्याने यंदाचे वर्ष सरकारी कर्मचा-यांसाठी आनंद घेऊन आल्याचे या निमित्ताने दिसत आहे.

राज्य सरकारने महाभाई भत्त्यात केलेल्या 3% वाढीमुळे महागाई भत्ता 9 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2019 ते 30 जून 2019 या कालावधीसाठी वाढीव 3 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.हेदेखील वाचा- 7th Pay Commission: नव्या वर्षात 'या' सरकारी कर्मचा-यांना पगार आणि डीए मध्ये मिळणार घसघशीत वाढ

जानेवारी 2019 ते जून 2019 या सहा महिन्यांची वाढीव महागाई भत्त्याची रक्कम जानेवारी 2021 च्या पगारात जोडली जाणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार घसघसीत मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

डिसेंबर 2020 महिन्यात याबाबतचे घोषणा करण्यात आली होती. ज्यानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) त्यांच्या पगारात आणि डीएमध्ये (DA) वाढ करण्यात होणार आहे असे सांगण्यात आले होते. ही घोषणा आता सत्यात अवतरली असून लवकरच याचा लाभ सर्व सरकारी कर्मचा-यांना मिळणार आहे.

दरम्यान दिल्ली सरकारने अकुशल श्रमिकांसाठी 15,492 रुपये, अर्धकुशल साठी 17,069 रुपये आणि कुशल कर्मचा-यांसाठी 18,797 रुपये असा पगार निर्धारित करण्यात आला आहे. तसेच लिपिक आणि पर्यवेक्षी कर्मचा-यांच्या पगारात देखील वाढ करण्यात आली आहे. यात गैर-मैट्रिक्युलेशन ला महिना पगार 17,069 रुपये मिळणार आहे. तर मेट्रिक पास मात्र गैर स्नातक यांना मासिक वेतन 18,797 रुपये मिळेल. तर स्नातक आणि त्यावर पदावर असलेल्यांना मासिक वेतन 20,430 रुपये मिळेल.