प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: File Photo)

संसार म्हण्टलं की भांड्याला भांड लागतचं. अनेक बायकांचा सासरच्या मंडळींकडून किंवा नवऱ्यांकडून छळ होत असल्याच्या विविध घटना तुमच्या कानावर पडत असेल. या प्रकरच्या घटनांमधून महिलांच्या सुरक्षतेसाठीचं महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ज्यामुळे महिलांना समाजात आणि स्वतच्या घरात सुरक्षित आयुष्य जगता येईल पण फासे उलटे पडले की काय आता असं म्हणायला हरकत नाही. कारण हल्ली घर संसारात महिलांप्रमाणेचं पुरुषांवर देखील स्वतच्या बायकोकडून छळ होत असल्याच्या अनेक घटना पुढे येत आहे. राज्यातील शहरीसह ग्रामिण भागातून विविध पुरुषांनी स्वतच्या पत्नी कडून छळ होत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. तर काही पुरुष तर लाजेपोटी स्वत बायकोचा त्रआस सहन करीत आहेत पण स्वतवर होणाऱ्या छळाबाबत कुणालाही माहिती देत नाही आहेत.

 

पुरुषांवर होण्याऱ्या सर्वाधिक तक्रारी गोंदिया जिल्ह्यात नोंदवण्यात आल्या आहेत. बायको नवऱ्याचा  छळ करीत असल्याच्या तब्बल ५८४ तक्रारी पुरुषांनी पत्नी विरोधात केल्या आहेत. तरी २०१२ ते २०२२ दरम्यानच्या पुरुषांच्या तक्रारीचा हा आकडा आहे. राज्यातील एका जिल्ह्यात जर एवढ्या मोठ्या संख्येने पुरुषांचा छळ होत असेल तर इतर जिल्ह्यातील पुरुषांना देखील या प्रकारच्या समस्या भेडसावत असतील. (हे ही वाचा:- Crime News: रक्षकचं झाला भक्षक! महिला पोलिस कर्मचाऱ्याकडे पोलिस अधिकाऱ्याने केली शरीर सुखाची मागणी)

 

तरी याच पार्श्वभुमिवर राज्यातील महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या महिला आयोगा प्रमाणेचं पुरु संरक्षणासाठी देखील पुरुष आयोग स्थापन केल्याची मागणी जोर पकडत आहेत. तरी राज्यात आता खरंच पुरुष आयोग स्थापन होणार का आणि येत्या काही काळात ते स्थापन झालचं तरी पुरुषांचा होणाऱ्या छळाची संख्या बघता हे काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही.