Maharashtra SSC, HSC 2021 Exams: फॉर्म नंबर 17 भरून 10 वी, 12वी ची परीक्षा देणार्‍यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2 नोव्हेंबरपासून होणार सुरू
Online Application | Photo Credits: Pixabay.com

Form 17 Online Registration Application Process:  यंदा कोरोना वायरस संकटाने सर्वत्रच शैक्षणिक वर्षाचेही बारा वाजवले आहेत. अद्याप महाराष्ट्रामध्ये शाळा- कॉलेज सुरू झालेले नाहीत. मात्र शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी पुढील वर्षी होणार्‍या 10 वीआणि 12वीच्या विद्यार्थ्यांची खाजगीरित्या परीक्षा देणार्‍यांसाठीची नोंदणी प्रक्रिया आता सुरू होणार आहे. खाजगीरित्या म्हणजेच फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देणारे विद्यार्थी 2 नोव्हेंबरपासून ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. यंदा कोविड मुळे मागील वर्षीचा निकाल उशिरा लागला परिणामी पुढील वर्षी 10-12 वी ची परीक्षा देणार्‍यांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या परीक्षांसाठी फॉर्म 17 ची प्रक्रिया आता सुरू होत आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यंदा खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाईन पद्धत बंद असेल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. Maharashtra SSC, HSC Supplementary Time Table 2020: 10वी, 12वीच्या पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर पासून होणार सुरू; इथे पहा सविस्तर वेळापत्रक.

फॉर्म नंबर 17 ऑनलाईन कुठे भराल?

  • पुढील वर्षी परीक्षा देणार्‍या बारावीच्या विद्यार्थ्यांना http//form17.mh.hsc.ac.in 2020 या वेबसाईटवर तर दहावीच्या विद्यार्थ्यांना http //form 17.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.
  • विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर 3-30 नोव्हेंबर या कालावधीत मूळ अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याच्या पावतीच्या दोन छायाप्रती आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहेत.
  • त्यानंतर संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनी जमा केलेली कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळांकडे जमा करतील.

 

दरम्यान विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेसाठी 1 हजार रूपये नोंदणी शुल्क आणि 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल. तर 12 वीच्या परीक्षेसाठी 500 रूपये नोंदणी शुल्क आणि 100 रूपये प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्यांना कार्यालयीन वेळेत 02025705207/ 25705207/25705271 यावर मदत मिळू शकणार आहे.