Maharashtra Unlock: मुंबईतील दुकाने आणि रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार, पहा राजेश टोपे नेमके काय म्हणाले
Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

Maharashtra Unlock:  राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होताना दिसून येत आहे.  अशातच राज्य सरकारने नियमात शिथिलता आणत आता सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने थिएटर्स, नाट्यगृहे ही येत्या 22 ऑक्टोंबर पासून पुन्हा एकदा खुली करण्यासाठी मान्यता दिली आहे. तर काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत अम्युझमेंट पार्क, दुकाने आणि रेस्टॉरंटच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. त्यानुसार मुंबईच्या हद्दीतील दुकाने आणि रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास आता परवानगी दिली आहे. रेस्टॉरंटमध्ये शेवटची ऑर्डर 1 वाजेपर्यंत देता येऊ शकणार आहे. (Maharashtra Unlock: राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांची वेळ वाढवण्याचा टाक्सफोर्सच्या बैठकीत निर्णय)

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात घोषणा केली होती की, थिएटर्स, नाट्यगृहे ही 22 ऑक्टोंबर पासून नियमांचे पालन करत सुरु करण्यात येतील. जर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रोटोकॉलचे ही पालन केले जाणार आहे.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या एका विधानात मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, आम्ही नियम हळूहळू शिथील करणार आहोत. रुग्णांचा आकडा कमी झाल्याचे दिसून येत आहे. 22 ऑक्टोंबर पासून आता थिएटर्स वगैरे सुरु होतील. त्याचसोबत रेस्टॉरंट आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या संदर्भात गाइडलाइन्स ठरवण्याचे निर्देशन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात धूत राहणे या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच नागरिकांनी बेसावध न राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.