महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळा सुरु झाला की, धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. उंच कड्यावरुन कोसळणारे धबधबे, फेसाळलेले पाणी पाहिले की, पावसाळ्यात पर्यटकांची पावले आपोआप त्याच्याकडे वळतात. परंतु, राज्यातील कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नसून गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील (Lonnavla) पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता लोणावळ्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच धबधब्यांपासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचे संकट असतानाही लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना गर्दी टाळण्याचे वारंवार आवाहन केले आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात नागरिक त्या ठिकाणी येत आहेत. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शक्यता असल्याने लोणावळ्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. हे देखील वाचा-Mumbai Local Update: सायन-कुर्ला स्थानकादरम्यान पाणी साचल्याने माटुंगा-मुलुंड दरम्यानची वाहतूक विस्कळीत
त्यानुसार, भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मन्की पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा धबधबे, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्रात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आले आहे. परंतु, महाराष्ट्रात कोरोनाचे संकट कायम असून राज्यात तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे सरकारसह प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.