महाराष्ट्रासोबतच देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus ) संकट आता हळूहळू नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच हे संकट पुन्हा आव्हान म्हणून उभे राहणार का? असा सवाल उपस्थित होण्यासारखे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना (Coronavirus In Maharashtra) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. गेल्या 24 तासात तर राज्यात तब्बल 4,787 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाल्याचे पुढे आले आहे. तर तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत राज्यात 3,853 जणांना कोरोनातून डिस्चार्जही मिळाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता ही संख्या 20,76,093 इतकी झाली आहे. यापैकी 19,85,261 जणांवर उपचार केल्याने आणि त्यांना बरे वाटू लागल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजघडीला राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 38,013 इतकी आहे. तर 51,631 जणांचा कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Coronavirus In Mumbai: वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर BMC पुन्हा अॅक्शन मोड मध्ये; चेंबूर मधील Maitri Park Society ला कडक नियमावलीचं पालन करण्याचे आदेश)
Maharashtra reports 4,787 new COVID-19 cases, 3,853 discharges, and 40 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 20,76,093
Total recoveries: 19,85,261
Active cases: 38,013
Death toll: 51,631 pic.twitter.com/XMBSavdCcc
— ANI (@ANI) February 17, 2021
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 95.62% इतके राहिले आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाटी राज्यात आजवर 15,43,55,268 नमुने तपासण्यात आले. एकूण नमुन्यांपैकी 20,76,093 जणांचे नमुणे कोरोना व्हायरस संक्रमित आढळले. टक्केवारीत सांगायचे तर हेच प्रमाण 13.43% इतके आहे. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसारर, राज्यात 1,664 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर 1,95,704 जणांना विलगीकरणात कक्षात ठेवण्यात आले आहे.