Gadchiroli Rains Update: महाराष्ट्रामध्ये कोसळत असलेला पाऊस आज ( 8 सप्टेंबर) दिवशी देखील कायम आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भात गडचिरोली (Gadchiroli) भागामध्ये मागील काही तासांपासून बरसणार्या तुफान पावसामुळे सध्या पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील काही तास या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगत या भागात रेड अलर्ट (RED Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.
पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणासह, मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या पश्चिम किनारपट्टी लगतच्या शहरांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मध्य महाराष्ट्रातही पाऊस धूमशान घालत असल्याने तेथील अनेक गावांमध्ये पाणीच पाणी झाल्याने आता पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. Mumbai Rains Update: मुंबईसह पालघर, कोल्हापूर मध्ये मुसळधार पाऊस; सखल भागात पाणी साचल्याने मुंबई पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
ANI Tweet
Maharashtra: Gadchiroli faces a flood-like situation following heavy rainfall. pic.twitter.com/nP7TyPrATt
— ANI (@ANI) September 8, 2019
स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणार्या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ( 7 सप्टेंबर) दिवशी 24 तासात गोंदिया मध्ये 208 MM, कोकणातील वेंगुर्लामध्ये159 mm, डहाणू मध्ये 146 mm, महाबळेश्वर मध्ये 147 mm, अलिबागमध्ये 127 mm आणि मुंबई मधेय 119 mm पावसाची नोंद करण्यात आली आहे.