Maharashtra Rain Update: आज पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून राज्यभरात येलो अलर्ट जारी
Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तरी  हवामान विभागकडून (IMD) आज राज्यभरात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. सकाळपासूनचं मुंबईसह (Mumbai) उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसताना दिसत आहेत. तर कोकणात (Konkan) मात्र हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), रायगड (Raigad) या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे. तरी पुढील 48 तास आणखी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

 

पुणे (Pune), नाशिक (Nashik), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), पालघर (Palghar) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) या भागात विजांच्या कडकडाटासह मुसधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. तरी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यभरात (Maharashtra) पुन्हा पावसाने कमबॅक (Come Back) केलं आहे. मराठवाड्यासह (Marathwada) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) पावसाची जोरदार बॅटींग (Bating) बघायला मिळत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) काही भागात मध्य रात्री पाऊस पावसाच्या सरी कोसळत आहे. (हे ही वाचा:- Mumbai Mega Block Update: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळा)

 

विदर्भातही (Vidarbha) सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), यवतमाळ (Yavatmal), अमरावती (Amravati) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. शहरी भागात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.