
Maharashtra Rain Update: राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावासाने (Rain) हजेरी लावली. मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यातहलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस सुरु आहे. ठाणे, मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे. राज्यात हवामान विभागाने अनेक ठिकाणी आज ऑरेंज (Orange) आणि यलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील काही ठिकाणी देखील पावसाने चांगलीच दडी मारली आहे.
उत्तर कोकणात बुधवारी आणि गुरूवारी या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवले आहे. विदर्भात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी मुंबई, ठाणे भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कल्याण, उल्हासनगर या परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस दर्शवला आहे.
नांदेड, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागात तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर पुणे,मुंबई, ठाणे, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस या ठिकाणी पावसाचा जोर कायम असणार असल्याचे सांगितले आहे. राज्यात काही दिवस पावसाचे असल्याचे भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.