पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits: PTI)

राज्यात मोठ्या कालावधीनंतर पोलिस भरतीचा (Police Recruitment) मुहुर्त निघाला आहे. या पोलिस भरतीसाठी अनेक उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहे. पण तांत्रिक बिघाडमुळे (Technical Error) एका उमेदवारास अर्ज करायला ५ तासांच्या जवळजवळ कालावधी लागत असुन अर्ज करणाऱ्या उमेदवारास मोठा त्रास होत होता. एवढचं नाही तर काही उमेदवारांचे तर काही केल्या अर्ज सबमिट (Submit) होईना. म्हणुन राज्यभरातील तरुणांनी याबाबत तक्रार केली होती. अनेक बड्या पत्रकारासह राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देखील पोलिस भरतीचा अर्ज करण्याची तारीख वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. पोलिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची मागणी बघता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी पोलिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवल्याची माहिती दिली आहे.

 

पोलिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आता १५ डिसेंबर २०२२ पर्यत अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर करण्यातील तांत्रिक अडचणी (Technical Error), विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त (Earthquake) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) हा निर्णय घेतल्याची माहिती राज्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Home Minister Devendra Fadnavis) दिली आहे. तरी आतापर्यत राज्यभरातून ११.८० लाख अर्ज प्रप्त झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. अर्ज करणाऱ्या एकुण उमेदवारांमध्ये महिलासह पुरुष उमेदवारांचा सहभाग आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, कोणती कागदपत्रे आवश्यक? इथे पाहा यादी)

राज्य सरकारच्या या वाढीव मुदतीमुळे राज्यातील तरुण इच्छुक उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांना संधीपासून मुकाव लागणार नाही. तर प्रत्येकास कागदपत्र जमा करण्यास आणि तांत्रिक अडचणी दुर करण्यास मुभलक वेळ मिळेल. यामुळे राज्यातील जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांना पोलिस भरतीचा अर्ज करता येईल.