Maharashtra Police Bharti | (File Image)

महाराष्ट्र पोलीस दल भरती (Maharashtra Police Bharti) प्रक्रियेस वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणीला (Physical Efficiency Test) सुरुवात झाली आहे. पोलीस दलात दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या हजारो तरुणांचे स्वप्न आता वास्तवात उतरणार आहे. राज्यभरातील लक्षवधी तरुण पोलीस भरतीचा नियमीतपणे सराव करत असतात. दरम्यान, राज्य सरकारने भरतीची घोषणा केल्यामुळे तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विशेष म्हणजे ही पोलीस भरती आतापर्यंतच्या पोलीस भरतीपेक्षा काहीशी वेगळी असणार आहे. कारण या भरतीत प्रथमच 100% तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. पारदर्शी आणि अचूक भरतीसाठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. पोलीस भरती शारीरिक चाचणी वेळापत्रक (Police Recruitment Schedule) इथे पाहा.

बेरोजगारीचे धक्कादायक वास्तव

राज्य पोलीस भरती प्रक्रियेमुळे एक धक्कादायक वास्तवही पुढे आले आहे. राज्य सरकार एकूण 14 हजार पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. मात्र, त्यासाठी तब्बल 18 लाख तरुणांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. म्हणजेच राज्यातील लाखो तरुणांच्या हाता काम नाही. अर्ज दाखल झालेल्या 18 लाख तरुणांपैकी फक्त 14 हजार तरुणांनाच भरती करुन घेतले जाणार आहे. त्यामुळे उर्वरीत लोकांचे होणार तरी काय हा प्रश्न आहे.

शारीरिक चाचणी वेळापत्रक

2 ते 4 जानेवारी 2023 - पुरुष उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

5 जानेवारी 2023 - महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

6 ते 14 जानेवारी 2023- पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी

15 ते 17 जानेवारी- पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी

रविवारचा दिवस- चाचणी होणार नाही

मौदानी चाचणी आवश्यक कागदपत्रं

उमेदवारांच्या ओळखपत्र (दोन प्रती) , आवेदन अर्ज छायांकित प्रती (दोन), सर्व मूळ कागदपत्रे, सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच, अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो), आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र.

दरम्यान, काही कारणांमुळे रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेलाही आजपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे राज्यभरांमधील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रदीर्घ काळापासून तरुणांना पोलीस भरतीची आस होती. अखेर तो दिवस उजाडला आहे. त्यामुळे तरुण मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवताना दिसत आहेत.