Monsoon 2020 | File Image

मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात काल (17 जुलै) समाधानकारक पाऊस पडला. थोडक्यात पावसाने महाराष्ट्राच्या (Maharashtra) अनेक जिल्ह्यात चांगली हजेरी लावली असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. आजच्या ताज्या अपडेट्सनुसार, आज दक्षिण कोकणात (South Konkan) तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच मुंबईत आज पावसाच्या सरी बरसणार असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे. तसेच काल रात्री मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

मुंबई पश्चिम उपनगरात गेल्या 2-3 दिवसांपासून चांगलाच पाऊस पडला. सध्या पावसाने मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली असून आज दिवसभर ढगाळा वातावरण राहिल असे वेधशाळेने सांगितले आहे. Mumbai Rains: मुंबई मध्ये कालपासून मुसळधार पाऊस; 2015 नंतर 24 तासांत पडणाऱ्या दुसर्‍या सर्वाधिक पावसाची नोंद

तर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी 3 जुलै रोजी मुंबईत 24 तासांत पडलेला दशकातील सर्वाधिक पाऊस होता. त्या दिवशी तब्बल 375.2 mm इतक्या या पावसाची नोंद झाली होती. त्या मागोमाग 3 जुलै 2014 रोजी 207.2 mm आणि 24 जुलै 2013 रोजी 215.6 mm इतक्या पावसाची नोंद झाली होती. परंतु, मुंबईच्या इतिहासातील सर्वाधिक पाऊस हा 27 जुलै 2005 रोजी बरसला होता. याची नोंद तब्बल 944.2 mm इतकी होती.