Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहेत. काल (18 जुलै) मुंबईत मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. मुंबईत (Mumbai) काल दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर आज आणि उद्या देखील मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकणात (Konkan) आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यासोबत मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

काल (18 जुलै) राज्याच्या अनेक भागात हलक्या सरी बरसल्या. तर काही भागात ढगाळ वातावरण होते. मुंबई पश्चिम उपनगरात गेल्या 2-3 दिवसांपासून चांगलाच पाऊस पडला. सध्या पावसाने मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली असून आज दिवसभर ढगाळा वातावरण राहिल असे वेधशाळेने सांगितले आहे.Monsoon Updates 2020: सावंतवाडी, वेंगुर्ला येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Watch Video)

तर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी 3 जुलै रोजी मुंबईत 24 तासांत पडलेला दशकातील सर्वाधिक पाऊस होता. त्या दिवशी तब्बल 375.2 mm इतक्या या पावसाची नोंद झाली होती. त्या मागोमाग 3 जुलै 2014 रोजी 207.2 mm आणि 24 जुलै 2013 रोजी 215.6 mm इतक्या पावसाची नोंद झाली होती. परंतु, मुंबईच्या इतिहासातील सर्वाधिक पाऊस हा 27 जुलै 2005 रोजी बरसला होता. याची नोंद तब्बल 944.2 mm इतकी होती.