Credit-(Pixabay)

Maharashtra: ठाण्यात लोकल रेल्वेमध्ये  मोबाइलचा स्फोट झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कळवा स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण उपनगरीय रेल्वेच्या  महिला डब्यात हा  स्फोट झाल्याचे समोर आले आहे.  एका महिला प्रवाशाच्या मोबाइलचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली होती, अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. हा स्फोट रेल्वेत सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास झाला आहे. लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात एका महिला प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाला, त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी पीटीआयला सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - कल्याण उपनगरी ट्रेनमध्ये सोमवारी रात्री ८.१२ वाजता कळवा स्थानकात घडलेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. हेही वाचा: Bangladeshi Nationals Arrested: महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम, मुंबई विमानतळावर तिघांना अटक; कारवाई सुरुच

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोटाचा आवाज जोरात  ऐकू आला. स्फोटामुळे डब्यात धुराचे लोट पसरले, त्यामुळे अनेक प्रवाशांनी पळून जाण्यासाठी दरवाजाकडे धाव घेत होते. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.