Maharashtra Mayor Elections 2019: महाराष्ट्रात 22 नोव्हेंबर रोजी पार पडणार 27 महापौर पदासाठी मतदान
Brihanmumbai Municipal Corporation (Photo Credits: PTI)

एकीकडे राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना, नगरविकास मंत्रालयाने (Ministry of Urban Development) महाराष्ट्रातील 27 महापौर पदांसाठी, बुधवारी आरक्षण जाहीर केले आहे. या पदांसाठी 22 नोव्हेंबर रोजी निवडणुका (Maharashtra Mayor Elections 2019) घेण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली आणि उल्हासनगर या खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर नवी मुंबई, जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद आणि चंद्रपूर या जागा. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे महापौर आणि उपमहापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

21 नोव्हेंबर रोजी ही मुदतवाढ संपत आहे, त्यामुळे त्याच वेळी राज्यातील 27 महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका होणार आहेत. वसई-विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिका अनुक्रमे अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीतील महिला नगरसेवक अहमदनगर व परभणी महामंडळाच्या प्रमुख असतील. (हेही वाचा: Mayoral Reservation: मुंबई महापौर पद पुन्हा खुल्या प्रवर्गासाठी राखीव)

मागासवर्गीयांना लातूर व धुळे येथून संधी मिळणार आहे, तर नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, मालेगाव मागासवर्गीय महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. महापौर निवडीच्या किमान 10 ते 12 दिवसांपूर्वी नव्या रोस्टरची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर निवडप्रक्रियेला वेग येतो. त्यानुसार आज बुधवारी मुंबईत महापौर आरक्षणासाठीचे रोस्टर काढण्यात आले. 'शहरातला पहिला नागरिक' असा मान महापौरांना असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे.