Maharashtra Lottery MahaMohini Results: महाराष्ट्र राज्य लॉटरी मध्ये 'महामोहिनी लॉटरी' चा साप्ताहिक निकाल होणार जाहीर; आज संध्याकाळी lottery.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पहा विजेत्यांची यादी
Maharashtra Lottery | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Rajya Lottery Result: महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये दर आठवड्याला 6 साप्ताहिक आणि 4 मिनी लॉटरीची सोडत काढली जाते. त्यामध्ये प्रत्येक रविवारी 'महामोहिनी' ही साप्ताहिक लॉटरी (Maha Mohini Lottery) सोडत जाहीर केली जाते. दर रविवारी जाहीर केलेल्या या साप्ताहिक लॉटरीच्या विजेत्याला 7 लाखाचे बक्षीस दिले जाते.

आज संध्याकाळी जाहीर होणाऱ्या महामोहिनी लॉटरीच्या पहिल्या विजेत्याला 7 लाख, दुसऱ्या विजेत्याला 2,000 आणि 1,000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे आजच्या 'महामोहिनी साप्ताहिक लॉटरी'मध्ये तुम्हीही नशीब आजमावणार असाल तर पहा या लॉटरीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल? महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल नियमित lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज संध्याकाळी जाहीर केला जातो. हा निकाल ऑनलाईनसोबतच वर्तमानपत्राच्या माध्यमातून पाहता येऊ शकतो. मग महाराष्ट्र राज्य लॉटरीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर पहा कसा बघाल निकाल? (हेही वाचा - शनिवार वाड्याचं नाव बदलून 'पेशवे-होळकर वाडा' करा - माजी आमदार प्रकाश शेंडगे)

महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?

  1. lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
  2. त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
  4. यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे त्यावर क्लिक करा. पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
  5. या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.

    विजेती रक्कम कधी मिळवाल?

     

    विजेत्याला रक्कम मिळवण्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे. तुम्हांला 'वैभवलक्ष्मी साप्ताहिक लॉटरी' मध्ये तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता, तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Adhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Xerox, Aadhar Card Xerox ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.