Maharashtra Lockdown Extended: महाराष्ट्रातील निर्बंध आणखी 2 आठवड्यांसाठी वाढवण्यात येणार- राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परिणामी, राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा अनेक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत. यामुळे राज्यात येत्या 1 जूननंतर अनेक निर्बंधात शिथिलता आणली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्यात 1 जूननंतरही लॉकडाऊनसारखे निर्बंध पुढील 2 आठवडे कायम ठेवण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे. यासंदर्भात पीटीआयने ट्विट केले आहे.

नुकतीच राजेश टोपे यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी त्यांनी कोरोना महामारीच्या संकटकाळात नागरिकांची लूट करणाऱ्या रुग्णालयांनाही इशारा दिला आहे. तसेच रुग्णालयांकडून कोरोना उपचारांसाठी लावण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलाचे ऑडिटरमार्फत ऑडिट केले जाईल, असे राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. आत्तापर्यंत फक्त दीड लाख रुपयांच्या वरच्या बिलांचेच ऑडिट केले जात होते. मात्र, आता प्रत्येक बिलाचे ऑडिट केले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईत आज कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी घट; 1000 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

पीटीआयचे ट्वीट-

महाराष्ट्रात (28 मे) 21 हजार 273 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तर, 34 हजार 370 जणांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात आतापर्यंत एकूण 52 लाख 76 हजार 203 जणांनी कोरोविरुद्ध लढाई जिंकली आहे. राज्यात सध्या एकूण 3 लाख 1 हजार 41 जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.02 टक्के इतके होते.