यावर्षीचा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) हा किताब हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) या मल्लाने पटकाविला आहे. हर्षवर्धनने पुण्याच्या काका पवार तालमीत (Kaka Pawar Talim) कुस्तीचे धडे घेतले होते. महत्वाचे म्हणजे आजची अंतिम लढत ही, लातूरच्या शैलेश शेळके आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या काका पवारांच्याच दोन्ही पठ्ठ्यांमध्ये पाहायला मिळाली. मात्र हर्षवर्धनने शैलेशचा 2-3 असा पराभव करत 63 व्या ‘महाराष्ट्र केसरी 2020' ही मानाची गदा पटकावली. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धनवर चहूकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून हर्षवर्धनचे कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम सामना पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (Shree Shiv Chhatrapati Krida Sankul, Balewadi) बालेवाडी येथे पार पडला. यामध्ये गतवर्षीचा विजेता बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके या दोघांचाही पराभव करत, हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा 'महाराष्ट्र केसरी' तर शैलेश शेळके ठरला उपविजेता. (हेही वाचा: Maharashtra Kesari Winner 2020: हर्षवर्धन सदगीर यंदाचा 'महाराष्ट्र केसरी', शैलेश शेळके उपविजेता; पुणे येथील काका पवार तालमीकडे चांदीची गदा)
यावर्षीचा महाराष्ट्र केसरी हा किताब हर्षवर्धन सदगीर या मल्लाने पटकाविला.आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक काका पवार यांच्या दोन्ही शिष्यांमध्ये लढत झाली.यामध्ये हर्षवर्धनने बाजी मारली. हर्षवर्धन सदगीरचे हार्दिक अभिनंदन व भावी कारकीर्दीसाठी शुभकामना. https://t.co/v2UDaGeY7N
— Supriya Sule (@supriya_sule) January 7, 2020
नाशिकचे पैलवान हर्षवर्धन सदगीर ठरले महाराष्ट्र केसरीचे मानकरी. सदगीर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/NQyxb0x7uD
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 7, 2020
आमच्या अकोले तालुक्यातील कुंभाळणे गावचा सुपुत्र हर्षवर्धन सदगीर यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'.
काका पवार यांच्या तालमीत डावपेच शिकलेल्या हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकून मानाची गदा पटकावली आहे. हर्षवर्धन यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
#महाराष्ट्रकेसरी pic.twitter.com/j0CEssj3gq
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 7, 2020
व्वा रं पठ्ठ्या!
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला २०२०चा महाराष्ट्र केसरी. अभिनंदन पैलवान! pic.twitter.com/pNO6VoNAic
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 7, 2020
नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत विजय मिळवीत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला असून नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हा ६३ वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन. pic.twitter.com/VsFYafYo4x
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 7, 2020
पै. हर्षवर्धन सदगीर याने ६३ व्या 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकावल्याबद्दल आणि पै. शैलेश शेळके याने 'उप महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकावल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
दोघांचे गुरू, अर्जुन पदक विजेते वस्ताद श्री. काका पवार यांचे अभिनंदन! 🤼♂️ pic.twitter.com/1zyhrbEmNi
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 7, 2020
दरम्यान, हर्षवर्धन सदगीर हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. याआधी कित्येक वर्षे त्याने नाशिक जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीचे प्रतिनिधित्व केले आहे. हर्षवर्धनचे आजोबाही नामांकित पैलवान होते. गेले पाच वर्षे तो पाच वर्षांपासून काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे.