उद्या महापरिनिर्वाण (Mahaparinirvan) दिन. बेळगावत (Belgaum) महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) बेळगाव दौऱ्यावर असणार आहे. पुर्वी हा दौरा ३ डिसेंबरला योजला होता पण काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलतं उद्या म्हणजेच सहा डिसेंबर महाराष्ट्राचे (Maharashtra) हे दोन्ही बडे नेते बेळगावला भेट देणार आहेत. तरी कर्नाटकाचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavraj Bommai) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात न येण्याचा ईशारा दिला आहे. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले महाराष्ट्राचे नेते बेळगावात आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बेळगावात येण्याची योग्य वेळ नाही असं वक्तव्य बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सिमावादाचा (Maharashtra Karnataka Border Dispute) खटला अजुनही न्यायालयात सुरु आहे, तो कायदेशीररीत्या लढावा असा सल्ला बोम्मई यांनी थेट महाराष्ट्राचे मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
तर मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) यांनी देखील ठासून सांगितलं आहे की महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अजूनही त्यांचा आणि चंद्रकांत पाटलांचा (Chandrakant Patil) बेळगाव (Belgaum) दौरा रद्द केलेला नाही. पण बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर या दौऱ्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तरी शंभूराजे देसाई (Shambhuraje Desai) म्हणालेत या दौऱ्यासंबंधीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) निर्णय घेतील. तरी दौऱ्यासंबंधीत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. (हे ही वाचा:- Sanjay Raut On Governor: राज्यपालांवर कारवाई करावीचं लागेल, हिवाळी अधिवेशनात विरोधक काय करतात ते बघाचं; संजय राऊतांचा राज्य सरकारला अल्टीमेटम)
महाराष्ट्राच्या (Maharashtra) मंत्र्यांनी सध्या बेळगावला भेट देऊ नये, असा इशारा कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी रामदुर्ग तालुक्यातील सालहळी गावात पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र (Karnataka Maharashtra Border Dispute) राज्यात असलेली परिस्थिती पाहाता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी सध्या बेळगावला (Belgaum) भेट देऊ नये असं वक्तव्य कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे.