महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून 7,751 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. थेट सरपंचपद (Sarpanch Election) आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हे मतदान Gram Panchayat Voting) आज (18 डिसेंबर) पार पडते आहे. आज झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी म्हणजेच (19 डिसेंबर) रोजी पार पडणार आहे. गावगाड्याची किल्ली कोणाच्या हातात द्यायची याबाबत गावकरी आज अंतिम निर्णय घेणार आहेत गावकऱ्यांचा निर्णय काय हे उद्या कळणार आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी निवडणूक?
अहमदनगर- 203
अकोला- 266
अमरावती- 257
औरंगाबाद- 219
बीड- 704
भंडारा- 363
बुलडाणा- 279
चंद्रपूर- 59
धुळे- 128
गडचिरोली- 27
गोंदिया- 348
हिंगोली- 62
जळगाव- 140
जालना- 266
कोल्हापूर- 475
लातूर- 351
नागपूर- 237
नंदुरबार- 123
उस्मानाबाद- 166
पालघर- 63
परभणी- 128
पुणे- 221
रायगड- 240
रत्नागिरी- 222
सांगली- 452
सातारा- 319
सिंधुदुर्ग- 325
सोलापूर- 189
ठाणे- 42
वर्धा- 113
वाशीम- 287
यवतमाळ- 100
नांदेड- 181
नाशिक- 196
एकूण- 7,751
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर पोलीसफाटा तैनात करण्या आला आहे. प्रामुख्याने संवेदनशिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावांमध्ये अधिक प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तौनात करण्यात आले आहेत. दरम्यान, नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.