राज्य सरकार कडून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 100 आणि 200 रूपयांचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता थेट 500 रूपयांच्या स्टॅंप पेपर वर यापुढील सारे खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र होणार आहे. सरकारचा हा निर्णय महसूल वाढविण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे.यामुळे आता सामान्यांच्या खिशाला भुर्दंड देखील पडणार आहे. slum rehabilitation projects देखील आता थे 500 रूपयांच्या स्टॅम्प पेपर वर होणार आहेत. आता त्यासाठी 100.200 रूपयांचा स्टॅम्प पेपर वापरला जाऊ शकत नाही.
वैयक्तिक कारणांसोबतच बँक आणि इतर कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठेखतानंतर केले जाणारे खरेदीखत, हक्क सोडपत्रासाठी देखील पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारचया या निर्णयावर टीका करताना मतांसाठी लाडकी बहिण योजना घेऊन हे सरकार आलं आता योजनेच्या जाहिरातीवर कोट्यवधी रुपये उधळले जात आहेत. जाहिरातीसाठी सरकारला पैसे अपुरे पडत आहेत तो तिजोरीमधील खडखडाट भरून काढण्यासाठी मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतला सरकारने घेतला आहे का? असा सवाल केला आहे. राज्य सरकारने यापूर्वीच महागाई, वीज दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली आहे त्यामध्ये आता ही मुद्रांक शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे. असे ते म्हणाले आहेत.
कुठे लागतो स्टॅम्प पेपर?
सामंजस्य करार प्रतिज्ञापत्र, वाटणीपत्र, पतसंस्था कामी हमीपत्र, संचकारपत्र, प्रतिज्ञापत्रे, लग्न नोंदणी, घर भाडे करार, वाहन खरेदी विक्री करार, जमीन व्यवहार विक्रीचे प्रतिज्ञापत्र, बँक, न्यायालय कामकाजासाठी राज्यात लाखोंची मुद्रांक विक्री होते. दरम्यान बँका व इतर ठिकाणांहूनही मुद्रांक खरेदी केली जाते. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून या विक्रेत्यांना मागणीप्रमाणे सरकारी चलन भरून दिल्यानंतर मुद्रांक दिले जातात.
दरम्यान